दत्तात्रय नागेश उर्फ़ द.ना.यांनी संकल्पानासाठी अपार कष्ट घेतले आहेत. कोणालाही प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी दुरध्वनी किवा पत्रव्यहारादवारे संपर्क साधत असत कुठेही गेल्यावर माहिती - संकलनाच्या वेळी त्या व्यक्त्तीला इतर माहिती भराभर देत असत. आळस हा शब्द हा शब्द त्यांच्याठाई नाही केव्हाही व कुठेही जायचे ठरले तर प्रत्यक्ष वेळेच्या आधी ते हजर असत.संकलनासाठी ‘द. ना‘. नी सर्वतोपरी योगदान केले आहे. ते सर्व शब्दात सांगणे कठीण आहे ह्यांच्या कुटूबियानीही या प्रकल्पासाठी पडेल ती मदत केली आहे. श्री अनंत कृष्णाजी करमरकर उर्फ़ अनंतराव- विलेपार्ल,मुंबई
संकलनासाठी यांनी सुध्दा अपार कष्ट केले आहेत प्रत्येक कार्यक्रमात त्यांता प्रत्यक्ष सहभाग होताच परंतु संकलनानंतर सुध्दा इतर गोष्टीत यार कर्णे याला फ़ार महत्त्व असते ती सर्व जबाबदारी त्यांनी आनंदाने स्वीकारली त्यामुळे प्रथम आवृत्तीला आकार आला.सर्व फ़ॉर्मस एकत्र करुन कुलवृत्तांच्या दृष्टीने व्यवस्थित लावणे व कांही त्रुटी असल्यास प्रत्यक्ष संपर्क साधणे ही कामे दिसतात तशी सरळ किंवा सोपी नाहीत .त्यामुळे त्याचे ही योगदान फ़ार महत्त्वाचे आहे .याच्या पत्न्नी सौ मेधा करमरकर व चिरंजीव यांनी ही ह्या उपक्रमाला फ़ारच मोठी मोलाची मदत केली आहे श्री श्रीकांत शरद करमरकर ठाणे कोणत्याही संस्थेत तरुण रक्ताची वानवा असते सुदैवाने आपल्या संस्थेला श्री श्रीकांत, करमरकर,ठाणे हे तरुण लाभले आहेत .प्रत्येक कार्यक्रम आखणीला व प्रत्यक्ष कृतीच्या वॆळी आवर्जून हजर असतात त्यानी सुद्धा संकलनासाठी फ़ारच मदत केली व ठाणे शहरातील ब-याच कूटूबियांशी प्रत्यक्ष संपर्क साधला आहे श्री विनायक दतात्रय करमरकर अंधेरी
श्री विनायक दतात्रय हे सुद्धा संस्थेच्या कामात जास्तीत जास्त सहभागी होतात व संकलनाच्या वेळी इतरांबरोबर जाऊन फ़ॉर्मस भरुन घेऊन फ़ार मदत केली वडील श्री. द ना.करमरकर यांच्या तालमीत तयार झाल्यामूळे ते स्व : त स्वंतत्रपणे एकटे जाऊन फ़ॉर्मस भरुन घेऊन आले .श्री विनायक दतात्रय हे पण तरुण उत्साही कार्यकते आहेत व आपल्या संस्थेची आणखी जबाबदारी नक्कीच उचतील यात शंका नाही.
शेवटी असे नमुद करावेसे वाटते की कोणत्या ही उद्दीष्टपुर्तीसाठी अपार कष्ट, कालबद्द कार्यक्रम याची नितांत आवश्यकता असते त्यामूळे उद्दीष्ट कितीही दुर्लभ असले तरी अशक्य नसते .
सुरेश रघुनाथ करमरकर
बोरीवली (प.), मुंबई ४०००९२
संपादकाची तळटीप
श्री सुरेश रघुनाथ करमरकर उर्फ़ सुरेशराव करमरकर, बोरीवली, मुंबई ह्यांनी आम्हा सर्वांचे भरभरुन कौतूक व आत्मस्तुती सर्वांनाच प्रिय असते परंतु पण एक गॊष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे की स्वत: सुरेशराव हे बॅक ऑफ़ महाराष्ट्रमध्ये एक वारिष्ट आधीकारी असून ही त्यांचा स्वभाव व काम करण्याची पध्दत इतकी साधी आहे की हा एवढा मोठा माणुस कधी ही ,कोठेलही व किती ही लहान काम करण्यास मागे पुढे पहात नाही त्यांनी व त्याच्या कुटूबियांनी कुलवृत्तांत संकलन व छपाईमध्ये बहूमोलाची कामागिरी बजावली आहे आणी त्याचा विसर कोणाला ही पडु शकणार नाही त्यानी ह्या कार्यात थोडे फ़ार योगदान दिले आहे असे जे म्हट्ले आहे त्यामध्ये त्यांच्या मनाचा मोठेपणा व विनयभाव दिसुन येतो त्याच्या ह्या मिस्कील स्वभावामूळेच आम्हां सर्वांमध्ये लोकप्रिय आहेत .अर्थातच त्यांनी शेवटी निष्कर्ष काढल्याप्रमाणे त्यांचे अक्षर सुधारण्यास नक्कीच मदत झाली असेल परंतू त्याही पेक्षा आधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रकल्पात सर्वतोपरी मदत करुनही त्याच्या श्रेयनामावली पासून आलिप्त राहण्याचा त्याचा स्वभाव व वृत्तीही खरोखरच लाख मोलाची आहे श्री सुरेशराव तुम्हांला आम्हां सर्वांच्या शुभकामना
श्यामकरमरकर |